Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 150 रुग्णांची भर; 25 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 14) 150 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 1 हजार 768 एवढी झाली आहे. तर आजवर 97 हजार 965 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सोलापूर (73 वर्ष, पुरुष) येथील आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 827 तर शहराच्या बाहेरील 770 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 705 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 271 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 108 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 861 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.