-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Corona Update : शहरात आज 151 नवीन रुग्णांची नोंद; 104 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 151 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 7 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 55 हजार 539 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 289 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 269 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 20 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 35 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 414 आहेत. आज दिवसभरात 9 हजार 228 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 59 हजार 894 जणांनी लस घेतली.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn