Pimpri Corona Update : शहरात आज 157 नवीन रुग्णांची नोंद, 153 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 157 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 413 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 71 हजार 853 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 7 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 463 रुग्ण गृहविलगीकरणात असून 544 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 56 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 426 आहेत. आज दिवसभरात 15 हजार 215 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 16 लाख 61 हजार 585 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.