Pimpri Corona Update : शहरात आज 159 नवीन रुग्णांची नोंद, 109 जणांना डिस्चार्ज, सहा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 159 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 90 हजार 855 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मोशीतील 46 वर्षीय पुरुष, रूपीनगर येथील 88 वर्षीय पुरुष, भोसरीतील 80 वर्षीय पुरुष, सांगवीतील 72 वर्षीय पुरुष, वाकड मधील 65 वर्षीय महिला आणि पालिका हद्दीबाहेरील मंचर येथील 32 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 855 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 384 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1591 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 657 अशा 2248 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 736 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 747 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.