Pimpri Corona Update : शहरातील 164 कोरोनामुक्तांना आज डिस्चार्ज, 156 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 156 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 164 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 63 हजार 306 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 73 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 327 रुग्ण गृहविलगीकरणात असून 746 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 37 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 410 आहेत. आज दिवसभरात 15 हजार 657 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 70 हजार 191 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.