Pimpri Corona Update : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 164 रुग्ण; 119 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपर- चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 25) 164 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 86 हजार 800 झाली आहे. दिवसभरात 1 रुग्णाचा मृत्यू झाला असून 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 1 हजार 179 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 119 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 83 हजार 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण चिंचवड (पुरुष 72 वर्ष) येथील रहिवासी आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 2 रुग्णांचे आज शहरात निदान झाले आहे. सध्या 237 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 381 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.