Pimpri corona update :  शहरात आज नवीन 168 रुग्ण; 205 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (शुक्रवारी, दि. 23) 168 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 86 हजार 464 झाली आहे. दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 1 हजार 286 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी 205 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आजवर एकूण 82 हजार 715 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 3 रुग्णांचा मृत्यू झाला.  हे रुग्ण चिंचवड (पुरुष 80 वर्ष), (पुरुष 85 वर्ष), च-होली (पुरुष 36 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले 2 रुग्ण बुलढाणा (पुरुष 57 वर्ष), सासवड (महिला 70 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 15 रुग्णांचे आज शहरात निदान झाले. सध्या 239 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 364 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.