Pimpri Corona Update: शहरात आज 176 नवीन रुग्णांची नोंद, 273 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 176 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 273 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 405 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 70 हजार 786 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 338 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 735 रुग्ण गृहविलगीकरणात असून 603 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 51 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 414 आहेत. आज दिवसभरात 10 हजार 436 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 15 लाख 51 हजार 921 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.