Pimpri Corona Update : शहरात 182 नवीन रुग्ण, 315 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 173 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 182 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 433 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 3 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात काळेवाडीतील 60 वर्षीय पुरुष, दिघीतील 83 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 69 वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 433 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 125 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1526 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रुग्णालयात उपचार घेणार्‍या 627 अशा 2153 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 911 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 800 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.