Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 183 रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 10) 183 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 97 हजार 973 एवढी झाली आहे. तर आजवर 94 हजार 479 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण मारुंजी (62 वर्ष, पुरुष), आळंदी (74 वर्ष, स्त्री) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 772 तर शहराच्या बाहेरील 738 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 575 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 149 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 90 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 3 हजार 424 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.