Pimpri Corona Update: शहरात आज 184 नवीन रुग्णांची नोंद, 204 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 184 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 204 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 408 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 71 हजार 337 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 431 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 853 रुग्ण गृहविलगीकरणात असून 578 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 54 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 428 आहेत. आज दिवसभरात 20 हजार 125 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 16 लाख 8 हजार 793 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.