Pimpri Corona Update : रविवारी शहरात 190 नवीन रुग्ण; 163 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 1) दिवसभरात 190 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 64 हजार 726 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 59 हजार 425 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरा बाहेरील एक तर शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 956 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 229 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 727 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 17 हजार 733 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 11 लाख 13 हजार 273 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.