Pimpri corona update : पिंपरी-चिंचवड शहरात आज नवीन 195 रुग्ण; 263 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 18) 195 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 85 हजार 518 झाली आहे.

दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून 263 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 1 हजार 948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी 263 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 81 हजार 370 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण सांगवी (75 वर्ष), चिंचवड (61 वर्ष), चिखली (64 वर्ष), भोसरी (40 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले 3 रुग्ण को-हाडे (54 वर्ष), रेलगाव (45 वर्ष), खेड (71 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 13 रुग्णांचे आज शहरात निदान झाले आहे. सध्या 356 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 288 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.