Pimpri Corona Update: शहरात आज 147 नवीन रुग्णांची नोंद; 195 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 147 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 195 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 67 हजार 568 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 982 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 966 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Kalapini : कलापिनी बालभवन येथे बालकांनी केले दीप पूजन

तर, 19 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 737 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 15 हजार 726 जणांनी कोरोना प्रतिबंधक (Pimpri Corona Update) लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.