Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 2 हजार 365 रुग्णांची नोंद, 1 हजार 271 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 365 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 1 हजार 271 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 531 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 2 हजार 359 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 16 हजार 169 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 15 हजार 654 रुग्ण गृहविलगीकरणात असून 515 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 114 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 580 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 940 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 75 हजार 611 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.