Pimpri corona Update : शहरात आज 2 हजार 394 नवीन रुग्णांची नोंद; 2261 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 239 आणि महापालिका हद्दीबाहेरील 155 अशा 2 हजार 394 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2261 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 19 आणि महापालिका हद्दीबाहेरील 9 अशा 28 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 15 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात आजपर्यंत 1 लाख 65 हजार 367 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 1 लाख 37 हजार 924 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2158 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 874 अशा 3032 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 5019 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 4938 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 30 हजार 869 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.