Pimpri corona Update : शहरात आज 2 हजार 396 नवीन रुग्णांची नोंद; 1453 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 351 आणि महापालिका हद्दीबाहेरील 45 अशा 2 हजार 396 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1453 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 15 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 21 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 10 पुरुष आणि 11 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 61 हजार 119 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 33 हजार 839 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2122 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 859 अशा 2981 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 4492 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3025 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 30 हजार 869 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आज दिवसभरात 9 हजार 801 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.