Pimpri Corona Update: किंचितसा दिलासा! शहरात आज नवीन 2 हजार 947 रुग्णांची नोंद; 2 हजार 367 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजारांपर्यंत गेलेली रुग्णसंख्या थोडी खाली आली असून शहराच्या विविध भागातील 2 हजार 947 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. त्यामुळे किंचितसा दिलासा मिळाला. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 367 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 542 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 30 हजार 497 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 28 हजार 166 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 27 हजार 557 रुग्ण गृहविलगीकरणात असून 609 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 43 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 757 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 580 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 35 हजार 165 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.