Pimpri Corona Update: शहरात आज 207 नवीन रुग्णांची नोंद; 152 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 207 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 152 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 879 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 371 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 66 हजार 874 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 879 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 228 रुग्ण गृहविलगीकरणात असून 651 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 51 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 456 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 758 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 12 लाख 1 हजार 345 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.