Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 215 नवीन रुग्ण; 104 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मागील काही दिवसात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज (रविवारी, दि. 22) पिंपरी-चिंचवड शहरात 215 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 90 हजार 606 एवढी झाली आहे. तर आजवर 87 हजार 275 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 586 तर शहराच्या बाहेरील 656 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 558 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 77 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 121 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 453 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.