Pimpri Corona Update : रविवारी शहरात 215 नवीन रुग्ण; 233 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 8) दिवसभरात 215 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 65 हजार 989 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 60 हजार 797 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरा बाहेरील एक तर शहरातील दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 359 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 833 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 259 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 574 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 8 हजार 8 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 11 लाख 67 हजार 768 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879e78998b0112c3',t:'MTcxNDA0OTU1Ny45MTAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();