Pimpri Corona Update : शहरात 216 नवीन रुग्ण, 436 जण कोरोनामुक्त, 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 209 आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 216 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 260 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 436 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 4 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड 33 वर्षीय युवक, 50 वर्षीय पुरुष, भोसरी 49 वर्षीय पुरुष, चऱ्होली येथील 36 वर्षीय युवक अशा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 260 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 83 हजार 810 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1523 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 627 अशा 2150 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 888 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर, 889 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.