Pimpri Corona Update : रविवारी शहरात 219 नवीन रुग्ण; 426 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आज (रविवारी, दि. 13) दिवसभरात 219 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 426 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 53 हजार 932 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 47 हजार 602 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 6 रुग्ण शहरातील तर 3 रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 2 हजार 107 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 364 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एक हजार 743 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी लसीकरण झाले नाही. आजवर शहरातील 5 लाख 26 हजार 563 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.