Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी कोरोनाचे 220 नवीन रुग्ण; 222 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मागील काही दिवसात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज (मंगळवारी, दि. 1) पिंपरी-चिंचवड शहरात 220 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 92 हजार 551 एवढी झाली आहे. तर आजवर 88 हजार 579 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 638 तर शहराच्या बाहेरील 671 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 1 हजार 45 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 1 हजार 289 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 234 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 697 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.