Pimpri Corona Update : शहरात आज 223 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 179 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 179 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 223 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 321 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 62 हजार 386 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 110 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 219 रुग्ण गृहविलगीकरणात असून 891 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 416 आहेत. आज दिवसभरात 15 हजार 909 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 42 हजार 182 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.