Pimpri Corona Update : शहरात आज 228 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 216 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 216 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 228 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 898 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 65 हजार 393 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 898 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 294 रुग्ण गृहविलगीकरणात असून 604 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 420 आहेत. आज दिवसभरात 5 हजार 126 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 38 हजार 491 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.