Pimpri Corona Update : शनिवारी शहरात 23 नवीन रुग्ण; 10 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरात आज (शनिवारी, दि. 14) दिवसभरात 23 नवीन रुग्ण (Pimpri Corona Update) आढळले. तर 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 618 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 55 हजार 645 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात रविवारी कोरोना लसीकरण राहणार बंद

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 80 रुग्ण सक्रिय (Pimpri Corona Update) आहेत. या सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 

पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी पालिकेच्या 19 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 1 हजार 736 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 35 लाख 86 हजार 811 जणांनी लस घेतली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.