-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Corona Update : रविवारी शहरात 258 नवीन रुग्ण; 183 जणांना डिस्चार्ज

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 20) दिवसभरात 258 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 55 हजार 388 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 49 हजार 888 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 5 रुग्ण शहरातील तर 3 रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 1 हजार 246 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 247 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 999 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 57 लसीकरण केंद्रांवर 7 हजार 391 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 5 लाख 50 हजार 596 जणांनी लस घेतली आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn