Pimpri Corona Update : रविवारी शहरात 259 नवीन रुग्ण; 205 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 4) दिवसभरात 259 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 58 हजार 993 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 53 हजार 352 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक रुग्ण शहरातील तर एक रुग्ण शहराच्या बाहेरील आहेत. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 1 हजार 348 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 274 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एक हजार 74 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 19 लसीकरण केंद्रांवर 19 हजार 439 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 7 लाख 2 हजार 966 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.