Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 3 हजार 573 रुग्णांची नोंद; 3 हजार 150 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 3 हजार 573 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. त्यामुळे किंचित्सा दिलासा मिळाला.  तर, कोरोनामुक्त  झालेल्या 3 हजार 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील  तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 545 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 34 हजार 70 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 28 हजार 586 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 28 हजार 3 रुग्ण गृहविलगीकरणात असून 583 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 43 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 859 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 476 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 42 हजार 641 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.