Pimpri Corona Update: दिवसभरात 34 जणांना कोरोनाची लागण, त्यात शहराबाहेरील 10 रुग्णांचा समावेश

Pimpri Corona Update: 34 people infected with corona in a day, including 10 out-of-town patients

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, वाकड, पिंपळेसौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर या परिसरातील 24 जणांचे आज (मंगळवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 13 पुरूष आणि 11 महिला तर, महापालिका हद्दीबाहेरीलही कसबा पेठ, आंबेगाव, दौंड, खडकी, देहूरोड येथील  एकूण 10 जणांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पिंपरी महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने तपासाणीसाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे सायंकाळी रिपोर्ट आले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, वाकड, पिंपळेसौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर परिसरातील 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे आहेत.

त्यामध्ये 13 पुरुष आणि  11 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापालिका हद्दीबाहेरीलही कसबा पेठ, आंबेगाव, दौंड, खडकी, देहूरोड 10 जणांनाही आज कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 7 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.   तर, आज चिंचवड, भोसरीतील दहा दिवस पूर्ण झालेल्या रूग्णांना  घरी सोडण्यात आले आहे.

आत्तापर्यंत शहरातील 559 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  232 सक्रिय रुग्णांपैकी महापालिका रुग्णालयात आणि काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  शहरातील 34 रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत 283 जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील 10 तर हद्दीबाहेरील 14 जणांचा अशा एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 60
# पॉझिटीव्ह रुग्ण – 34
#निगेटीव्ह रुग्ण – 02
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 152
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 413
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 14
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 559
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 232
# शहरातील कोरोना बाधित 34 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  24
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 283
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24120
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 67778

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.