Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज 40 नवीन रुग्णांची नोंद; 84 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध भागातील 40 नवीन कोरोनाबाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे (Pimpri Corona Update) मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 645 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 271 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 257 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Swachh Bharat Mission : ‘सिटीझन फीडबॅक’मध्ये पिंपरी-चिंचवड देशात अव्वल; सर्वेक्षणात 19 वा क्रमांक

तर, 14 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 800 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 79 हजार 162 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.