Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 53 रुग्णांचा मृत्यू; दोन हजार 830 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 18) 2 हजार 830 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 83 हजार 746 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 58 हजार 684 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 380 तर शहराच्या बाहेरील एक हजार 24 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 22 हजार 682 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 15 हजार 13 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 7 हजार 669 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 185 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 4 हजार 250 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी सात हजार 103 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 3 लाख 3 हजार 349 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.