Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज नवीन 544 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 80 हजार 480

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 4) 544 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 80 हजार 480 झाली आहे. दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 691 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 3 हजार 434 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 691 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 73 हजार 671 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण च-होली- (40 वर्ष), चिंचवड (62 वर्ष, 31 वर्ष), पिंपळे गुरव (36 वर्ष, 60 वर्ष, 61 वर्ष), पिंपरी (70 वर्ष), पिंपळे निलख (72 वर्ष), रावेत (66 वर्ष), चिखली (75 वर्ष) दापोडी (62 वर्ष), पिंपळे सौदागर (57 वर्ष), निगडी (89 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले 7 रुग्ण सहकार नगर (78 वर्ष), जुन्नर (63 वर्ष), खडकवासला (57 वर्ष), आबेगाव (77 वर्ष), भोर (62 वर्ष), जुन्नर (48 वर्ष), विश्रांतवाडी (52 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 13 रुग्णांचे आज शहरात निदान झाले नाही. सध्या 589 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 723 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.