Pimpri Corona Update : शहरात आज 6 नवीन रुग्णांची नोंद; 20 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील (Pimpri Corona Update) 6 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 72 हजार 479 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 101 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 100 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

PCMC Encroachment : महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

तर, महापालिका   रुग्णालयामध्ये 1 रुग्ण दाखल आहे.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 228 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 87 हजार 676 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.