Pimpri Corona Update : शहरात आज 65 नवीन रुग्णांची नोंद; 50 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 65 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 70 हजार 999 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 400 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 390 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Dog Rescue Pune : लोखंडी गेटमध्ये अडकलेल्या कुत्र्याची पुणे अग्निशमन दलाकडून सुटका

तर, 10 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 1 हजार 175 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 70 हजार 134 जणांनी कोरोना (Pimpri Corona Update) प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.