Pimpri Corona Update: शहरात रविवारी नवे 651 रुग्ण, 753 जणांना डिस्चार्ज; बाधितांची संख्या 16 हजार 283

Pimpri Corona Update: 651 new patients, 753 discharged in the city on Sunday; The number of victims is 16,283 आजवर एकूण 10 हजार 911 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 26) 651 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 16 हजार 283 झाली आहे. नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून 753 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 3 हजार 427 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 753 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 10 हजार 911 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर लागू झालेल्या ‘अनलॉक’च्या पहिल्या दिवशी 843, दुस-या दिवशी 1 हजार 79 आणि तिस-या दिवशी 651 एवढे रुग्ण सापडले आहेत.

आज मृत झालेले रुग्ण वाकड (स्त्री 65 वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष 55 वर्षे), निगडी (पुरुष 52 वर्षे), चिंचवड (स्त्री 65 वर्षे, पुरुष 54 वर्षे, पुरुष 64 वर्षे), चिखली (पुरुष 86 वर्षे), मोरवाडी (स्त्री 71 वर्षे), पाषाण (पुरुष 30 वर्षे) येथील रहिवासी आहेत. आजवर शहरात 284 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 299 रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 36 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 20 हजार 86 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 66 हजार 509 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.