Pimpri Corona Update: शहरात आज 70 नवीन रुग्णांची नोंद; 77 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 70 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 69 हजार 269 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 403 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 378 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Khadki : खडकीतून परदेशी नागरिकाला सात लाखांच्या अंमली पदार्थासह अटक

तर, 25 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 280 नागरिकांचे लसीकरण (Pimpri Corona Update) झाले. आजपर्यंत 37 लाख 35 हजार 442 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.