Pimpri Corona Update : शहरात आज 713 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 158 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 158 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 713 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 6 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 226 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 54 हजार 90 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 549 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 197 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 352 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 85 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 635 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 181 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 28 हजार 744 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.