Pimpri Corona Update: शहरात आज 76 नवीन रुग्णांची नोंद, 55 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहराच्या विविध (Pimpri Corona Update) भागातील 76 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 61 हजार 573 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 888 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 860 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pimpri Corona Update: चिंताजनक! शहरात आज नवीन 138 कोरोना रुग्णांची नोंद

तर, 28 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 309 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 45 हजार 528 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.