Pimpri corona Update : शहरात 794 जण कोरोनाचे सक्रिय रुग्ण; गुरुवारी नवीन 114 रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे 794 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज (गुरूवारी, दि. 10) शहरात 114 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दिवसभरात 294 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 93 हजार 928 एवढी झाली आहे. तर आजवर 90 हजार 473 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरूवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एक रुग्ण पालिका हद्दीतील आहे. तर एक रुग्ण हद्दीच्या बाहेरील आहेत.

मृत्यू झालेला शहरातील रुग्ण चिंचवड (73 वर्ष) येथील आहे. तर शहराच्या बाहेरील रुग्ण धनकवडी (71 वर्ष) येथील आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 711 तर शहराच्या बाहेरील 690 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 714 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 950 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 76 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 122 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.