Pimpri: चिंतेची बाब ! शहरातील 833 सक्रीय रुग्णांपैकी 664 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत

Pimpri Corona Update: 80 per cent patients in the city have no symptoms, 16 per cent patients have symptoms and cure rate is 59 per cent कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्ध आणि लहान मुलांना असला तरी लागण होण्याचे प्रमाण युवकांना आहे. कोरोनाने तरुणांना अक्षरश: विळखा घातला आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लक्षणीय बाब म्हणजे तब्बल 80 टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. लक्षणे नसलेले रुग्ण हे वाहक बनण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ही धोकादायक गोष्ट आहे. 833 सक्रीय रुग्णांपैकी तब्बल 664 म्हणजेच 80 टक्के रुग्णांमध्ये काहीच लक्षणे नाहीत.

केवळ 131 म्हणजेच 15.72 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 4.56 टक्के म्हणजेच 38 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत 2115 रुग्णांपैकी तब्बल 1246 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचे प्रमाण 58.91 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाने संपूर्ण शहराला विळखा घातला आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाला 100 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट होताना दिसून येत आहे. 10 मार्च ते 24 जून या 106 दिवसांमध्ये औद्योगिकनगरीतील 2115 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज दुपारी दीडवाजेपर्यंत 77 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चितेंत भर पडली आहे.

चिंताजनक बाब म्हणजे तब्बल 79.71 टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. सध्या 833 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 664 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

त्याचे प्रमाण 79.71 आहे. तर, केवळ 131 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. त्याचे प्रमाण 15.72 टक्के आहे. 38 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्याचे प्रमाण 4.56 टक्के आहे.

आणखी दिलासादायाक बाब म्हणजे आजपर्यंत 2115 रुग्णांपैकी तब्बल 1246 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58.91 टक्के आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाचा सर्वाधिक धोका वृद्ध आणि लहान मुलांना असला तरी लागण होण्याचे प्रमाण युवकांना आहे. कोरोनाने तरुणांना अक्षरश: विळखा घातला आहे.

22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 844 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे.

या वयोगटातील 547 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 271 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 223 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 228 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.