Pimpri corona update : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 812 रुग्ण; एकूण संख्या 76 हजार 79

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 27) 812 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 76 हजार 79 झाली आहे. दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून 914 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 4 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 914 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 67 हजार 296 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 15 आणि हद्दीबाहेरील 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण आकुर्डी(पुरुष 71 वर्षे), भोसरी (पुरुष 70 वर्षे, पुरुष 75 वर्षे पुरुष 67 वर्षे), पिंपरी (पुरुष 58 वर्षे), दिघी(पुरुष 56 वर्षे, पुरुष 55 वर्षे), काळेवाडी(पुरुष 65 वर्षे). निगडी (पुरुष 56 वर्षे पुरुष 73 वर्षे), वाल्हेकरवाडी(पुरुष 74 वर्षे) च-होली (स्त्री 74 वर्षे), सांगवी (स्त्री 61 वर्षे), संततुकाराम नगर, पिंपरी (पुरुष 48 वर्षे), चिखली (पुरुष 54 वर्षे) येथील आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील एकाही रुग्णांचे आज शहरात निदान झाले नाही. सध्या 985 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 597 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.