Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 845 रुग्णांची भर; 403 रुग्णांना डिस्चार्ज, 5 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 14) 845 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 403 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 14 हजार 26 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 5 हजार 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी पाच रिग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण मोशी (पुरुष, 68 वर्ष), विठ्ठल नगर (पुरुष, 47 वर्ष), संत तुकाराम नगर (पुरुष, 64 वर्ष), निगडी (महिला, 67 वर्ष), आळेफाटा (पुरुष, 37 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 876 तर शहराच्या बाहेरील 790 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 6 हजार 894 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 5 हजार 575 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 1 हजार 319 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 61 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 हजार 148 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 1 हजार 443 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 63 हजार 319 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.