Pimpri Corona Update : रविवारी शहरात 85 नवीन रुग्ण; 61 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 3) दिवसभरात 85 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 74 हजार 176 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 69 हजार 568 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 894 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 486 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 408 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 24 हजार 17 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 20 लाख 10 हजार 348 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.