Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवड शहरात आज 871 नवीन रुग्णांची भर तर 797 जणांना मिळाला डिस्चार्ज

Pimpri Corona Update: 871 new patients in Pimpri-Chinchwad on Sunday; 797 people were discharged आजवर एकूण 15 हजार 479 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 2) 871 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 22 हजार 934 झाली आहे. आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून 797 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 3 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 797 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 15 हजार 479 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत झालेले रुग्ण पिंपळेगुरव (पुरुष 56 वर्षे) काळेवाडी (पुरुष 72 वर्षे) चिखली (पुरुष 57 वर्षे) भोसरी (स्त्री 47 वर्षे) पिंपरी (पुरुष 56 वर्षे) चिंचवड (पुरुष 58 वर्षे) आळंदी (पुरुष 72 वर्षे) पुणे (पुरुष 60 वर्षे) येथील रहिवासी आहेत. आजवर शहरात 355 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील एकाही रुग्णांचे आज निदान झाले नाही. सध्या 308 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 39 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 21 हजार 194 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 68 हजार 257 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III