Pimpri Corona Update : रविवारी शहरात 9 नवीन रुग्ण; 6 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरात आज (रविवारी, दि. 8 मे) दिवसभरात 9 नवीन रुग्ण आढळले. तर 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 547 एवढी झाली आहे. तर, आजवर 3 लाख 55 हजार 586 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Vaccination in Pune – 6 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा अजूनही राज्य सरकारकडून आदेश नाही

कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  शहरात 68 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 19 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 1 हजार 509 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत शहरातील 35 लाख 80 हजार 558 लोकांनी (Pimpri Corona Update) लस घेतली आहे.

Pimpri News : शहरातील 19 केंद्रांवर सोमवारी होणार लसीकरण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.