Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 92 रुग्णांचा मृत्यू; 2 हजार 933 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 2) दिवसभरात कोरोनामुळे 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 933 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 485 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 15 हजार 393 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 90 हजार 421 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 3 हजार 33 तर शहराच्या बाहेरील एक हजार 521 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 21 हजार 938 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 13 हजार 984 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 7 हजार 954 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 291 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 492 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 552 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 4 लाख 2 हजार 885 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.