Pimpri Corona Update: शहरात रविवारी 92 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, 22 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona Update: 92 people tested positive in city on Sunday, 22 discharged आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भाटनगर पिंपरी 66 वर्ष आणि बोपखेल येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि.21) 92 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहरात कोरोना बधितांची संख्या एक हजार 768 झाली आहे. त्यातील एक हजार 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 669 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भाटनगर पिंपरी 66 वर्ष आणि बोपखेल येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज 480 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. 337 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 360 जणांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी महापालिका हद्दीच्या बाहेरील 72 जणांवर पिंपरीत उपचार सुरू आहेत. हद्दीबाहेरील 23 जणांचा शहरात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर 111 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील 10 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण खालील परिसरातील आहेत –

गांधीनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, आंबेडकरनगर पिंपरी, इंद्राणीनगर चिंचवड, रहाटणी, पिंपळे सौदागर, वैदुवस्ती, पवारनगर काळेवाडी फाटा,‍ रिव्हररोड पिंपरी, चिंचवड, मोरेवस्ती चिखली, राजीवगांधी वसाहत नेहरूनगर, आनंदनगर चिंचवड, चिखली, लांडेवाडी भोसरी, शास्त्रीचौक भोसरी, थेरगांव, मोहननगर चिंचवड, यमुनानगर, जयभीमनगर दापोडी, जुनी सांगवी, वैष्णवदेवी मंदीर पिंपरी, किनारा हॉटेल दापोडी, धावडे आळी भोसरी.

कोकणेनगर काळेवाडी, च-होली, नेहरुनगर, विशालनगर पिंपळे निलख, देहू आळंदी रोड चिखली, आदर्शनगर ‍दिघी, लालटोपीनगर मोरवाडी, खानदेश नगर मोशी, दिघीरोड भोसरी, संततुकारामनगर पिंपरी, बोपखेल, साधुवासवानी गार्डन पिंपरी, गणेशनगर पिंपरी, नलवडेचाळ नेहरूनगर, समर्थनगर नवी सांगवी, आदर्शनगर काळेवाडी, आनंदनगर जुनी सांगवी, शिवक्लासिक सोसायटी मोशी, विद्यानिकेतन स्कुल निगडी, बौध्दनगर पिंपरी, मिलिंदनगर पिंपरी, चिंचवड, डिमार्ड जवळ चिंचवड, ताम्हाणे वस्ती चिखली, भारतनगर दापोडी, महात्मा फुलेनगर पिंपरी, आळंदी, बोपोडी, देहूगांव, कोथरुड व हिंजवडी.

आज डिस्चार्ज दिलेले रुग्ण खालील परिसरातील आहेत –

मोरेवस्ती चिखली, अजंठानगर आकुर्डी, शाहूनगर चिंचवड, पिंपरी कॉलनी, वैभवनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, साईबाबानबर चिंचवड, तापकिरनगर काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, रमाबाईनगर पिंपरी, आनंदनगर चिंचवड, नेहरुनगर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.