Pimpri Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज तब्बल 950 नवे रुग्ण; एकूण संख्या 35 हजार 397

Pimpri Corona Update: 950 patients in Pimpri-Chinchwad today; Total number 35 thousand 397 रविवारी 604 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 24 हजार 981 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि.16) 950 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 35 हजार 397 झाली आहे. 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून 604 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 5 हजार 204 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 604 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 24 हजार 981 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे-
नवी सांगवी (पुरुष 75 वर्ष), चिंचवड गाव (पुरुष 19 वर्ष), निगडी (स्त्री 65 वर्षे, स्त्री 65 वर्षे, पुरुष 71 वर्ष), भोसरी (पुरुष 88 वर्ष), रुपीनगर (पुरुष 43 वर्ष), जुनी सांगवी (पुरुष 37 वर्ष), मोरेवस्ती चिखली (स्त्री 75 वर्ष), काळेवाडी (स्त्री 6 वर्षे, स्त्री 40 वर्ष), मोशी (स्त्री 65 वर्ष), वाकड (पुरुष 70 वर्षे, पुरुष 74 वर्ष), पिंपळे निलख (स्त्री 80 वर्ष).

संत तुकाराम नगर पिंपरी (पुरुष 85 वर्षे), अजमेरा कॉलनी पिंपरी (पुरुष 63 वर्षे, पुरुष 81 वर्ष), दापोडी (पुरुष 80 वर्षे, पुरुष 50 वर्षे), दिघी (पुरुष 24 वर्ष), चिंचवड (पुरुष 47 वर्षे, पुरुष 75 वर्षे), बोपखेल (पुरुष 78 वर्ष), पिंपळे गुरव (पुरुष 54 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 12 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 445 रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 48 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी 16 हजार 348 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 57 हजार 747 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.